20240418 Phan-Rang (पांडुरंग) - Hindu Temple, Vietnam - 2
Thu 18 Apr 2024 | Vietnam National Day | World Heritage Day व्हिएतनामच्या निन्-थुआन या प्रांतात फ़ान्-रांग हे शहर आहे. फ़ान्-रांग म्हणजे पांडुरंग. तिथे जाण्याचा चांगला योग काल जुळून आला. काही शे वर्षे या देशात (यासह इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया व चीन यांचे काही भाग - येथे) भारतीय चोळ वंशीय राजांचे राज्य होते. त्यांनी आपल्यासोबत इथे हिंदूधर्म आणला, रुजवला - तो बहरला - तो आजतागायत इथे आहे. इथे भारतीय राजांची सत्ता ही रक्ताचा थेंबही न सांडता नांदू लागली त्यामुळे त्याची दखल तशी इतिहासात घेतली गेली नाही. शेवटी एका बाजूने चिन्यांच्या व दुसरीकडून फ़्रेंचांच्या आक्रमणापुढे ते राज्य हतप्रभ झाले. गुगल मॅप्स ~ https://bit.ly/PhanRang_area या भारतीय राज्याला चंपा असे नाव होते. त्या चंपा राज्याचे हिंदू रहिवासी आजही स्वतःला चाम् असे म्हणवून घेतात. व्हिएतनाम सरकारने या चाम ‘वंशीय’ लोकांसाठी खास संरक्षक भाग म्हणून हे फ़ान्-रांग शहर योजून दिले आहे. इथले सुंदर मंदीर बांधणारा व शहर वसवणारा राजा स्वतःस पांडुरंग म्हणवून घेई, म्हणून या शहराचे न...