Posts

" अनादि मी " (anaadi me) means "I am timeless"!    This expression in Marathi symbolizes an eternal struggle. Grammatically it doesn't, but the great visionary Vir Savarkar has given this phrase a completely new dimension.    While serving his double life imprisonment as a political activist in the Andaman islands' Kala Pani - Cellular Jail at the hands of the British in early 1900s, a 20 something young Vinayak had to face many testing times and also fight depression owing to the inhuman tactics of the 'gentlemen' Britishers.    At one point of time when he started having suicidal thoughts, a brilliant & timeless poem came to him & lifted him up, taking him far away from all the defeatist thoughts he might be having. The poem addressed to the death personified says, "I am timeless, eternal & immortal - and there's no foe born yet who can finish me". "अनादि मी - अनंत मी - अवध्य मी भला ... मारील रिपु जगती असा कवण जन्मला...

20260727 Cockroach Party आंदोलनाचे प्रश्न

Image
प्रश्न गहन आहेत.    "देश सडक से नहीं संसद से चलेगा" हे म्हणणे बरोबर. पण संसदेत / विधिमंडळात / महापालिकेत / पंचायतीत जाण्यासाठी ज्या पद्धतीचे खर्च, कंपूबाजी, राजकारण इ. करावे लागते तिथपर्यन्त सामान्य माणूस पोहोचू शकत नाही हेही सत्य आहे. सरकार / प्रशासनाला प्रश्न विचारण्याची सोय नाही हेही सत्य आहे. बहुदा कळीचा मुद्दा तोच आहे. एकदा निवडून आलो की आपल्याला कुणी प्रश्न विचारू शकत नाही आणि दर पाच वर्षांनी ढोबळमानाने करायचे निवडणूकीतील मतदान भावनिक मुद्द्यांद्वारे, पैसे वाटप करून इ. प्रकारांनी मॅनेज केले की (इव्हीएम वा वोटचोरी नव्हे हे मानले तरी) - पुढची पाच वर्षे आपल्याला कुणी विचारायला येणार नाही ही खात्री या नष्टचर्यात निवडणुकांचे लाभार्थी व जनता गोलगोल फ़िरत आहेत. राजीनामा नाट्य यामुळे आहे.    लोकशाही ही एक त्यातल्या त्यात बरी व्यवस्था आहे इतकेच. ती काही सर्व प्रश्नांवर अंतिम उत्तर नाही. लोकशाहीच्या सगळ्या मर्यादा आपल्या समोर वारंवार उघड्या पडत आहेत. पण शेवटी तीच सगळ्यात बरी - म्हणून तिलाच चालवणे भाग आहे. तिच्या जुन्या मर्यादांवर काही नव्या युगाचे / टेक्नोलॉजीचे उपाय करणे...

20260624 Unfortunate murder of Ketan by fiancé Siya

Image
  आणखी एक अतिशय दुर्दैवी प्रकरण - उपवधूने उपवराला ठार केल्याचे. आपल्या माध्यमांचे वार्तांकन अशा प्रकरणात अनावश्यक भडक व सर्वथा अपुरे असते. आताही ते तसेच आहे. आरोपीला बोलते करणे, गुन्ह्याचे खरे कारण पुढे आणणे, त्यावर भडकपणा व मिडिया ट्रायल टाळून साधक चर्चा घडवणे व समाजमनाला विवेक विचार प्रवृत्त करणे हा दृष्टीकोन आपल्या कुरघोडीच्या स्पर्धेत व्यस्त असलेल्या माध्यमांना कधी लाभावा?     आताच्या दुर्दैवी प्रकरणातले जोडपे ही शिकलेली सधन मुले होत. त्यांना आधुनिक मूल्यांची पुस्तकी जाण नक्कीच असणार. प्री-वेडिंग शूट करायला सिंहगड आणि खून करायला लोहगड निवडला जातो यावरून त्यांची पढतमूर्खता समजून येते. लग्नासाठीचा नकार आई बापाला - म्हणजेच जात बिरादरीला - म्हणजेच समाजाला उघड करण्यापेक्षा जोडीदाराच्या खुनाचा रस्ता सोपा वाटणे हे आपल्या समाजाच्या खाप-पंचायती सदृश मानसिकतेचे निदर्शक आहे. मुलांची लग्ने ही कौटुंबिक बडेजावाचे प्रदर्शन करण्याची अनिष्टता व तद्मूलक ताण तणाव घेऊन येतात.     अमक्या व्यक्तीशी लग्न करायचे नाही - तर तसे स्पष्ट सांगून आपला रस्ता निवडायची अक्कल वा हिं...

20260606 Saturday - 🪷 Chua Kim Son - Nha Trang, Vietnam

Image
Buddhist Temple "KIM SON" , NhaTrang , Vietnam  Whenever I make a promise to a temple or a mountain - I can't not keep it.    While wandering Nha Trang on bike this February, me and my wife had spotted these worn out yet welcoming temple steps spiraling into a hill.  The temple ‘Chua Kim Son’ has been in my promise for some four to five months. And today I am happy that I could keep that beautiful promise.    Here apart from the spectacular view from top, the mural of sari clad pretty Indian ladies requesting the child Gautama not to leave the palace was very beautiful.    Apparently there’s a motorable path up the hill also, but the spiraling steps I mentioned seem more fun. Hardly 50 – 70 of them make the temple visit worth a while.  We all love scenic hills, serene hill temples and particularly those who preserve their magic even in the city. All the three beautiful peaks of distant Cotien Hill saying 'hi'!    The last pic h...

20260604 "Why Dhurandhar?" - Dnyanesh Deshpande

Image
देशभक्ती ही एक कमअस्सल वा मानवता विरोधी भावना आहे असे समजण्याची फ़्याशन सध्या बोकाळली आहे. जगभराचे बाल्कनायझेशन करून जिकडे तिकडे लालभडक हिंसक क्रांत्या करण्याच्या वांत्या करणारे डावे नॅरेटीव्ह बिल्डर्स यामागे आहेत हे स्पष्ट आहे. नीट विचार करता हे लक्षात येते की मानव विकासाच्या वा मानव मुक्तीच्या चार पायऱ्या कोणत्या - तर "व्यष्टी - समष्टी - सृष्टी - परमेष्टी"! देशभक्ती / देशसेवा हे समष्टीच्या पायरीवरचे कर्तव्य आहे. ते नीट पार पाडले की मग आपल्याला परमेष्टीच्या / मानवतेच्या गप्पा करण्याची पातळी प्राप्त होते.  हा शुद्ध भारतीय विचार आहे. हा आपल्या रक्तात लहानपणापासून आपोआप पेरला गेला आहे. त्यामुळेच, आयात संकल्पनांचे मळभ दूर होऊन भारतीय मनाच्या मुशीतून घडणाऱ्या कलाकृतींतून तो मांडला जाऊ लागला आहे याचे सहर्ष अप्रूप वाटल्यावाचून राहात नाही.  नेमके हेच या छोट्या लेखात ज्ञानेशने उत्तम प्रकारे दाखवून दिले आहे. 

डीलिमिटेशन / ५०% जागा वाढ / ३३% महिला आरक्षण ~ रामबाण उपाय

Image
सोबतची चर्चा केवळ वानगीदाखल आहे. सर्वच माध्यमांनी मुद्दाम काही ना काही घोळ करून वा शब्दांचे खेळ करून हा विषय घोडचुकीने हाताळला आहे. अपेक्षेप्रमाणे थिंक बँक वाल्यांनी सरकारने लोकसभेत ठेवलेल्या प्रस्तावाच्या मेरिट्समधे जाण्याचे टाळले. त्याला अनुल्लेखाने मारले नाही एवढेच काय ते. शेवटी तेही खोट्या पुरोगामीत्वाची लागण झालेले च्यानेल! आणखी काय करणार? असो.     मान्यवर भाष्यकार म्हणून आणलेल्या प्रकाश पवार सरांचा पूर्वग्रह लपत नाही. "५०% वाढ म्हणजे नेमके काय - ते स्पष्ट नाही" असे म्हणत त्यांनी चालवलेला श्रोत्यांना संभ्रमित करण्याचा उद्योग हास्यास्पद आहे. त्यावेळच्या लोकसभेच्या पूर्ण डिबेटमधे याचा वारंवार खुलासा झालेला आहे. वा अमित शहांची तिथली दोन भाषणे सर्व शंकांना उत्तरे देणारी आहेत. सर्वांना ५०% वाढवून मिळण्यामधे दक्षिणेच्या राज्यांचे / विरोधकांचे काय जळत होते? ५०% जागा वाढ व ३३% महिला आरक्षण यां दोन्ही गोष्टी व्यवस्थित घडून येऊ शकत असतानाही विरोधी पक्षांनी ती सुवर्णसंधी नाकारली - ती नादानपणामुळे नक्कीच नाही. ती नाकारली क्षुद्र स्वार्थापायी. भाजपाला विरोधासाठी विरोध करण्याच्या ...

20250930 Bangladesh's Chicken Neck & Seashore for NE India

Image
FaceBook | Kaunteya Desh | September 30, 2025  १९४७ साली फाळणीच्या वेळेस काँग्रेस नेतृत्वाची सगळी अक्कल काय खात होती हा प्रश्नच आहे. आताही तीच परिस्थिती आहे म्हणा - पण ते असो. फाळणी म्हटली की आपण पाकिस्तान , काश्मीर , कबालिए , युनोची घोडचूक ... या सगळ्या ट्रॅकवर जातो. पण पूर्वेला बंगाल बाबतीत काय गमावलं ... काय कमरेचं काढून दिलं हे लक्षात घेत नाही. त्रिपुरा राज घराण्यातल्या प्रद्योत देववर्मा यांची स्मिता प्रकाशांसोबतची मुलाखत पाहिली आणि तिथल्या भूराजकीय आव्हानाची तीव्रतेने आठवण झाली. बांग्लादेशचा नीच शासक महंमद युनुसने दोन महिन्यांपूर्वी चीनमधे जाऊन - (१) पूर्ण ईशान्य भारत हा भाग लँड लॉक्ड आहे , ( २) बांग्लादेश व चीनने सिलिगुडी चिकन नेक ताब्यात घेतला तर हा भाग भारतापासून तुटेल - कारण (३) या भागाला बंगालच्या उपसागराचा access नाही अशा अर्थाची बडबड केली. त्यामुळे थोडे परत नकाशात पाहिल्यावर आपल्याला पहिल्यांदा हे समजून आले की मुख्यतः त्रिपुरा , मिझोराम अद्याप भारतात आहेत हा निव्वळ आकाशात देव आहे याचा पुरावा होय. तेव्हा तर सिक्कीमही स्वतंत्र हिंदुस्थानचा भाग नव्हता. मग त्याखालच...

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -

Image
   सध्या हिंदुत्व विचारात दिसणारे मुख्य प्रवाह म्हणजे -      [१] हिंदुधर्मातले ईश्वर तत्व, कर्मकांडे यां पलिकडे जाऊन प्रामुख्याने राजकीय / राष्ट्रीय / विज्ञाननिष्ठ हिंदू बनणे; त्यासाठी संकीर्ण अभिनिवेशांचे विसर्जन करणे, आवश्यक सुधारणा करवणे = सावरकरी पीळ     [२] ईश्वर भक्ती, तत्संबद्ध प्रेरणा, भावना, कर्मकांडे, पोथीनिष्ठा, परंपरानिष्ठा, रूढीप्रियता, identity चा आग्रह, मंदिरे यां सर्वांचा एकत्रित आविष्कार = सनातनी पीळ     [३] यां दोहोंमधे सतत समन्वयाचे पूल बांधत राहणे, मध्यममार्ग शोधत राहणे, समतोल साधण्याचा प्रयत्न करणे, वैचारिकतेचा आग्रह न धरता हिंदू संघटनावर फ़ोकस करणे, रचनात्मक कार्य = संघाचा पीळ     हे तीन्ही प्रमुख प्रवाह असले तरी यांतील मंडळींची एकमेकांत सरमिसळ होत असते.  यां सर्वांमधे व्युत्पन्नता, अनुकंपा, समदृष्टी, सृजनशीलता ... आणि इतर अनेक अपेक्षित सद्‌गुण काही सुटत नाहीत.  पण अहंमन्यता, डोळेझाक, प्रतिगामीत्व, पुरूष प्रधानता, जातभावना असे अपेक्षित नसलेले दुर्गुणही - त्या प्रणालीचा भाग नसले तरी ...

20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh

Image
We prefer visiting temples filled with genuine devotion, where the focus is on the divine, not the perfect selfie angle.  There's something special about the buzz of true worshippers rather than the clicking sound of camera shutters.     Entry fees are fine, of course, but there's a subtle difference between a spiritual journey and a sightseeing tour, don't you think?      South East Asia, being the land of Buddhism, we find both the kinds in abundance, both beautiful.      Last Sunday myself and our son Shivam could visit one such real temple called Chua Suối Dổ (चुअ स्वै दो) or literally the waterfall temple some 12 kms off the city of Nha Trang where Chua = a pagoda & Suối Dổ = a stream or waterfall.         Motor biking at a leisurely speed for about 11 kms from Nha Trang city to the pagoda is a beautiful experience in itself. We took a little off-beaten road which took us via various small villages just besid...

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

Image
मी-सन, व्हिएतनामचे भद्रेश्वर मंदीर.  हिंदू व्हिएतनामबद्दल लिहावे तितके कमी आहे. व्हिएतनाममधे येणाऱ्या भारतीय पर्यटकांनी चंपा साम्राज्याच्या हिंदू मंदीरांतील #ChamTemples मला ज्ञात असलेल्या साताठ ठिकाणांमधून किमान एक दोन मंदीरे तरी करावीत असे मी मागे लिहिले होते.  पण परवा एका ब्रिटिश प्रवाश्याच्या पानावर हो चि मिन्ह शहराच्या नजीकच्या एकट्या मेकाँग डेल्टा मधल्या पन्नास चाम मंदीरांचे सविस्तर वर्णन वाचले आणि डोक्याला हात लावला. आमच्या न्या-चँग #NhaTrang शहरातले भव्य असे महिषासुर मर्दिनी मंदीर #Ponagar सोडले तर बाकी सर्व मंदीरे आजही दुर्गम भागांत आहेत. त्याचे उत्तर काय - तर मंदीरे शांत असावीत व मानवी वस्तीपासून लांब असावीत असा चंपा राजांचा दंडक होता.  पर्यटकांचे आकर्षण असलेल्या #Danang पासून जवळच "मी-सन" #MySon या ठिकाणचे श्री भद्रेश्वर शिवमंदीर व अगणित अवशेष यांचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग मी व चिरंजीव शिवम् यां दोघांसाठी गेल्या सप्तान्ताला, शनि १४ व रवि १५ डिसें २०२४ रोजी जुळून आला.  त्या क्षेत्राचे सध्या भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संशोधन व विकसन केले जात आहे. त्य...