20250930 Bangladesh's Chicken Neck & Seashore for NE India


FaceBook | Kaunteya Desh | September 30, 2025 

१९४७ साली फाळणीच्या वेळेस काँग्रेस नेतृत्वाची सगळी अक्कल काय खात होती हा प्रश्नच आहे. आताही तीच परिस्थिती आहे म्हणा - पण ते असो.

फाळणी म्हटली की आपण पाकिस्तान, काश्मीर, कबालिए, युनोची घोडचूक ... या सगळ्या ट्रॅकवर जातो. पण पूर्वेला बंगाल बाबतीत काय गमावलं ... काय कमरेचं काढून दिलं हे लक्षात घेत नाही.

त्रिपुरा राज घराण्यातल्या प्रद्योत देववर्मा यांची स्मिता प्रकाशांसोबतची मुलाखत पाहिली आणि तिथल्या भूराजकीय आव्हानाची तीव्रतेने आठवण झाली. बांग्लादेशचा नीच शासक महंमद युनुसने दोन महिन्यांपूर्वी चीनमधे जाऊन -
(१) पूर्ण ईशान्य भारत हा भाग लँड लॉक्ड आहे
,
(२) बांग्लादेश व चीनने सिलिगुडी चिकन नेक ताब्यात घेतला तर हा भाग भारतापासून तुटेल - कारण
(३) या भागाला बंगालच्या उपसागराचा
access नाही
अशा अर्थाची बडबड केली. त्यामुळे थोडे परत नकाशात पाहिल्यावर आपल्याला पहिल्यांदा हे समजून आले की मुख्यतः त्रिपुरा
, मिझोराम अद्याप भारतात आहेत हा निव्वळ आकाशात देव आहे याचा पुरावा होय.

तेव्हा तर सिक्कीमही स्वतंत्र हिंदुस्थानचा भाग नव्हता. मग त्याखालची कोंबडीची मुंडी फक्त हातात ठेवून बाकी सगळे पाकिस्तानला खोलून देण्यात भारतीय नेतृत्वाची नेमकी काय अगतिकता होती?

नकाशावर रेषा मारून झाल्या होत्या, माउंटबॅटनने विमानाचे तिकीट काढले होते, त्याला घाई होती, तिला घाई होती, जिन्ना ऐकत नव्हता, सिव्हिल वॉर पेटले होते, हिंदू प्रतिकार करू लागले होते, तो वाढला असता तर मग??? - यापैकी काय समजायचे?

किमानपक्षी, "त्रिपुराच्या खालची चिकन नेक - चितगाव बंदर व मिझोराम यांतला भाग आम्ही सोडू शकत नाही. आम्ही एका चिकन नेकच्या जोरावर सबंध ईशान्य भारत लँड लॉक्ड सोडू शकत नाही. होऊन जाऊद्या खूनखराबा" असे सांगणारा एकही नेता आपल्याकडे नव्हता? असे geo strategic thinking नव्हते?? हे कसे काय घडू दिले गेले???

काँग्रेस सगळी नेहरूंच्या भजनी लागली होती म्हणूत ... पण मग राष्ट्रवादी / हिंदुत्व क्यांपातून कुणाचाही काही संदर्भ या बाबतीत कसा कुठेच सापडत नाही (मला तरी)?

बहुदा ... "फ़ाळणी" म्हटली की आपण आजही सगळे लक्ष हे काश्मीर सह पूर्व पाकिस्तानावर केंद्रित करतो आणि बांग्लादेशामुळे दुरावलेल्या प्रदेशांना खिजगणतीत घेत नाही - तसेच तेव्हाही झालेले दिसते. 

मुलाखतीची लिंक | ANI Podcast Ep 346👇

चितगाँव हिल ट्रॅक्ट्स - CHT वरील एक उत्तम व्हिडिओ. 👇

प्रातिनिधिक प्रतिक्रीया ~

Pankaj Shirke

मणिपूर चे पण असेच काहीतरी आहे.

१) Kabaw valley एकदा सर्च करून बघा.

हा मणिपूरचा भाग होता, २२,००० चौरस किलोमीटर भाग होता, पण नेहरूंनी तो भाग मणिपूर मध्ये विलीन होऊ दिला नाही, म्यानमार कडे राहू दिला(मणिपूर कडील मैतेयी समुदाय हा भाग मणिपूर कडे यायला इच्छुक होता). Kabaw valley मणिपूर कडे असती तर North east कडे मणिपूर राज्य आसाम एवढे मोठे असते.

Kabaw valley ही arakan डोंगररांग आणि chindwin नदीच्या मध्ये आहे(अरुणाचल, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम कडील म्यानमारला लागून असलेला चिंचोळा पट्टा म्हणजे kabaw valley). Ha भाग भारतात असता तर अरुणाचल, नागालँड आणि मिझोरम चे सीमा म्यानमारला लागल्या नसत्या.

विचार करा, गोवा राज्य ४००० चौरस किलोमीटर आहे आणि kabaw valley २२,००० चौरस किलोमीटर आहे(गोव्याच्या पाचपट).

२) आसाम मधील sylhet जिल्हा, हिंदूबहुल होता पण जोगेंद्रनाथ मंडल ने इथल्या हिंदूंना सेक्युलॅरिझम चा डोस दिला, त्यामुळे इथल्या हिंदूंनी त्या मंडल चे ऐकून पाकिस्तान मध्ये रहायचे ठरवले, नंतर मंडल भारतात पळून आला पण हिंदूबहुल सिल्हेत जिल्हा पाकिस्तानला देऊन आला(हा जिल्हा आसाम मध्ये असता तर बांगलादेश चा उत्तर भाग chiken neck मध्ये असता, पण सिल्हेत जिल्हा बांगलादेश कडे गेला आणि भारतात chicken neck तयार झाला.

 

Prakash Limaye

खरे म्हणजे त्या कळत p. k. मेनान , बेनेगल राव, h v r. ऐयांगर सारखे अनेक उत्तमोत्तम प्रशासक अधिकारी होते. त्यांनी सुचवले असणारच पण वरिष्ठ नेतृत्वच कमकुवत , नको तितके स्वप्नाळू असल्याने असे झाले.

मी ती मुलाखत पाहिली , खूप छान आहे.

 

Mukund Gondhalekar

भारतावरील ब्रिटिश सत्तेच्या अखेरच्या काळात मुसलमानांसाठी स्वतंत्र देशाची मागणी जोरदारपणे होऊ लागली. ब्रिटीश विलायतेला परत गेल्यानंतर हिंदु बहुल भारतात इस्लामचे काय होईल ही भिती हे या मागणीचे कारण होते हे उघड आहे. त्याकाळातल्या काळातल्या कॉन्ग्रेस नेतृत्वाने, मोहनदास करमचंद गांधी यांनीही, जितका शक्य होईल तितका विरोधच केला या मागणीला. परंतु, नाइलाजाने या मागणीला मान्यता दिल्यानंतर ब्रिटीश इंडीयातील मुसलमान बहुल भूभागाचे पाकिस्तान निर्माण करणे हे ओघाने आलेच. त्यातूनच पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान निर्माण झाले.

धर्माच्या पायावर आधारित फाळणीचे तत्व एकदा मान्य केल्यानंतर "अमका भूभाग सामरिक दृष्ट्या आमच्यासाठी महत्वाचा असल्यामुळे तो आम्ही देणार नाही" - अशी भूमिका घेणे मूर्खपणाचे ठरले असते.

पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तानला जोडणारा, भारतातून जाणारा भूपट्टा (कॉरिडॉर) द्या अशीही पाकिस्तानवाद्यांची मागणी होती. ती मागणी त्या काळातल्या कॉन्ग्रेस नेतृत्वाने मान्य केली नाही.

पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान हे एकजिनशी राष्ट्र होऊ शकत नाही, हे भारतीय नेतृत्वाने त्याचवेळी ओळखले होते, व योग्य वेळ येताच, फाळणीनंतर केवळ २४ वर्षांत, रसद व सैन्य बळ पुरवून पूर्व पाकिस्तानात बांगला देश या स्वतंत्र देशाची निर्मिती केली कॉन्ग्रेस नेतृत्वाने. बांगला देश निर्मीतीचे सुईणपण भारताने केलेले असल्यामुळे, १९७१ नंतर काही वर्षे बांगला देशात भारताला अनुकुल असलेले सरकार सत्तेवर राहिले. मधला काही कालंड वगळता नंतर परत अनेक वर्षे भारताला अनुकुल असलेली मुजीब कन्या हसीनाला सत्तेवर ठेवण्यात भारत यशस्वी झाला. इशान्य भारतात बांगला देशमार्गे जाण्या येण्यासाठी पुरेशा सोयी सवलती मिळविण्यात भारत यशस्वी झाला असता. परंतु, बांगला देशातील सत्तेचा सारीपाट उधळला गेला.

इशान्य भारताशी उर्वरित भारताची जोडणी करणारा भूभाग पुरेसा रुंद व विस्तृत नाही, याचा दोष जर तकालीन कॉन्ग्रेस नेतृत्वाच्या नाथी मारायचा असेल तर, पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तानला जोडणारा, भारतातून जाणारा भूपट्टा (कॉरिडॉर) दिला नाही आणि २४ वर्षांत पाकिस्तानचे तुकडे करून भारत स्नेही बांगला देश निर्माण केला यांसाठी कॉंग्रेस नेतृवाचे खुल्या मनाने कौतुकही केले पाहिजे.

आपले शेजारी कोण व कसे असावे याचा विचार आपण सामान्य माणसे नेहेमीच करतो. म्हणूनच, देशपांडे, कुलकर्णी, गोंधळेकर, वगैरे भेंडीबाजारात नाही जात राहायला. गिरगाव, दादर, विले पार्ले, डोंबिवली अशाच ठिकाणी घर घेतात. आपले शेजारी देश कसे असावे, याचा विचार व त्यासाठी जमेल तितकी लुडबुड भारतासारखे मोठे देश करतात. श्रीलंकेत कोण असावा, माल्दीवात कोण असावा, बांगला देशात कोणाला रसद पुरवायची - हे ठरवून त्यानुसार हालचाली केल्या जातात हे उघड गुपित आहे. हे असे सर्वत्र चालते म्हणूनच ट्रम्प तात्या आरोप करतात कि अमेरिकी निवडणुकीत पुतीन अणांनी लुडबुड केली.

बांगला देशात भारत स्नेही हसीनाचे सरकार सत्तेत टिकले नाही हे अपयश मोदी सरकारच्या खात्यात डेबिट करावे का?

सत्तर, पंच्याहत्तर वर्षांपूर्वींच्या कॉंग्रेस नेतृत्वावर सतत टीका करीत राहाणे ही भाजपाची राजकीय गरज आहे, सत्तेत टिकून राहाण्यासाठी. परंतु, सामान्य नागरिकांनी सत्तर, पंच्याहत्तर वर्षांपूर्वींच्या घटनांकडे तसेच त्याही आधीच्या इतिहासाकडे सतत भाजपाच्या चश्म्यातून पाहाण्याची गरज नाही. असे करणे धोक्याचे आहे. 🙏

 

Kaunteya Desh

@Mukund Gondhalekar

हे भाजपच्या चष्म्यातून बघणे नाही. काँग्रेसचे नाव येते कारण तेव्हा तेच होते.

  

Sharadmani Marathe

फाळणी हे हिंदू समाजाचे collective failure आहे असे मला वाटते.

  

Shaunak Kulkarni

लोकप्रिय गोपीनाथ बार्डोलाई यांचा स्वातंत्र्य आणि फाळणीच्या काळातील लढा आणि गांधी-नेहरूंशी झालेली चर्चा-वादावादी खतरनाक आहे.

नेहरूंचं त्या काळात वक्तव्य आहे, "भारताच्या व्यापक हितासाठी काहींनी त्याग केला पाहिजे." हा त्याग म्हणजे आसामने भारतात येण्याचा हट्ट सोडला पाहिजे. धन्य!

यावरुन मुद्दा पेटला आणि गोपीनाथ बार्डोलाई 'लोकप्रिय' झाले. पुढे १९६२ युद्धात तेच. नेहरूंचं वक्तव्य "My Heart Goes with the people of Assam.." म्हणजे यांनी मनातून मान्य केलं होतं की ईशान्य भारत गेला.

त्रिपुरा मध्ये मी स्वतः गेलेलो आहे. पण ते अशा वयात की तेव्हा समज फार नव्हती. डाव्यांची सत्ता कायम होती त्यामुळे लोक उघडपणे काही बोलायला कचरत असत. डावी राजकीय हिंसा काय होती हे सर्वांनाच माहिती आहे.

आणि मुलाखत प्रसिद्ध झाल्याच्या पुढल्या आठवड्यात चितगांव भागात स्थानिकांनी 'आम्हाला भारतात विलीन व्हायचं आहे' म्हणत आंदोलन सुरु केलं आहे.

हे भारत पुरस्कृत आहे वगैरे वगैरे युनूसचा गृहमंत्री म्हणतो आहे. योगायोग नसावा.

Comments

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -