Posts

Showing posts with the label Cham Temples

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

Image
मी-सन, व्हिएतनामचे भद्रेश्वर मंदीर.  हिंदू व्हिएतनामबद्दल लिहावे तितके कमी आहे. व्हिएतनाममधे येणाऱ्या भारतीय पर्यटकांनी चंपा साम्राज्याच्या हिंदू मंदीरांतील #ChamTemples मला ज्ञात असलेल्या साताठ ठिकाणांमधून किमान एक दोन मंदीरे तरी करावीत असे मी मागे लिहिले होते.  पण परवा एका ब्रिटिश प्रवाश्याच्या पानावर हो चि मिन्ह शहराच्या नजीकच्या एकट्या मेकाँग डेल्टा मधल्या पन्नास चाम मंदीरांचे सविस्तर वर्णन वाचले आणि डोक्याला हात लावला. आमच्या न्या-चँग #NhaTrang शहरातले भव्य असे महिषासुर मर्दिनी मंदीर #Ponagar सोडले तर बाकी सर्व मंदीरे आजही दुर्गम भागांत आहेत. त्याचे उत्तर काय - तर मंदीरे शांत असावीत व मानवी वस्तीपासून लांब असावीत असा चंपा राजांचा दंडक होता.  पर्यटकांचे आकर्षण असलेल्या #Danang पासून जवळच "मी-सन" #MySon या ठिकाणचे श्री भद्रेश्वर शिवमंदीर व अगणित अवशेष यांचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग मी व चिरंजीव शिवम् यां दोघांसाठी गेल्या सप्तान्ताला, शनि १४ व रवि १५ डिसें २०२४ रोजी जुळून आला.  त्या क्षेत्राचे सध्या भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संशोधन व विकसन केले जात आहे. त्य...

20240418 Phan-Rang (पांडुरंग) - Hindu Temple, Vietnam - 2

Image
 Thu 18 Apr 2024 | Vietnam National Day | World Heritage Day     व्हिएतनामच्या निन्‌-थुआन या प्रांतात फ़ान्‌-रांग हे शहर आहे. फ़ान्‌-रांग म्हणजे पांडुरंग. तिथे जाण्याचा चांगला योग काल जुळून आला.    काही शे वर्षे या देशात (यासह इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया व चीन यांचे काही भाग - येथे) भारतीय चोळ वंशीय राजांचे राज्य होते. त्यांनी आपल्यासोबत इथे हिंदूधर्म आणला, रुजवला - तो बहरला - तो आजतागायत इथे आहे. इथे भारतीय राजांची सत्ता ही रक्ताचा थेंबही न सांडता नांदू लागली त्यामुळे त्याची दखल तशी इतिहासात घेतली गेली नाही. शेवटी एका बाजूने चिन्यांच्या व दुसरीकडून फ़्रेंचांच्या आक्रमणापुढे ते राज्य हतप्रभ झाले.   गुगल मॅप्स ~ https://bit.ly/PhanRang_area     या भारतीय राज्याला चंपा असे नाव होते. त्या चंपा राज्याचे हिंदू रहिवासी आजही स्वतःला चाम्‌ असे म्हणवून घेतात. व्हिएतनाम सरकारने या चाम ‘वंशीय’ लोकांसाठी खास संरक्षक भाग म्हणून हे फ़ान्‌-रांग शहर योजून दिले आहे. इथले सुंदर मंदीर बांधणारा व शहर वसवणारा राजा स्वतःस पांडुरंग म्हणवून घेई, म्हणून या शहराचे न...

20240418 Phan-Rang (पांडुरंग) - Hindu Temple, Vietnam

Image
Thu 18 Apr 2024 | Vietnam National Day | World Heritage Day     to Phan-Rang (पांडुरंग) - Thap Cham - Po Klong Garai Temple with Mr Khanh, Mrs Ngoc, kids, Ms Trang & Desh    World heritage day spent best ever! I am fortunate to visit this Hindu temple at Phan-Rang (Pandurang) city, Ninh-Thuan, Vietnam.     Great many thanks to Khanh & Ngoc for inviting me on their family tour & also to Trang for most professional arrangements.    "baba vishwanath mil gaye hain, vietnam mein bhi!" 🪷🙏🏼    FB ~ https://bit.ly/Desh-ThapCham1