Posts

Showing posts from May, 2026

डीलिमिटेशन / ५०% जागा वाढ / ३३% महिला आरक्षण ~ रामबाण उपाय

Image
सोबतची चर्चा केवळ वानगीदाखल आहे. सर्वच माध्यमांनी मुद्दाम काही ना काही घोळ करून वा शब्दांचे खेळ करून हा विषय घोडचुकीने हाताळला आहे. अपेक्षेप्रमाणे थिंक बँक वाल्यांनी सरकारने लोकसभेत ठेवलेल्या प्रस्तावाच्या मेरिट्समधे जाण्याचे टाळले. त्याला अनुल्लेखाने मारले नाही एवढेच काय ते. शेवटी तेही खोट्या पुरोगामीत्वाची लागण झालेले च्यानेल! आणखी काय करणार? असो.     मान्यवर भाष्यकार म्हणून आणलेल्या प्रकाश पवार सरांचा पूर्वग्रह लपत नाही. "५०% वाढ म्हणजे नेमके काय - ते स्पष्ट नाही" असे म्हणत त्यांनी चालवलेला श्रोत्यांना संभ्रमित करण्याचा उद्योग हास्यास्पद आहे. त्यावेळच्या लोकसभेच्या पूर्ण डिबेटमधे याचा वारंवार खुलासा झालेला आहे. वा अमित शहांची तिथली दोन भाषणे सर्व शंकांना उत्तरे देणारी आहेत. सर्वांना ५०% वाढवून मिळण्यामधे दक्षिणेच्या राज्यांचे / विरोधकांचे काय जळत होते? ५०% जागा वाढ व ३३% महिला आरक्षण यां दोन्ही गोष्टी व्यवस्थित घडून येऊ शकत असतानाही विरोधी पक्षांनी ती सुवर्णसंधी नाकारली - ती नादानपणामुळे नक्कीच नाही. ती नाकारली क्षुद्र स्वार्थापायी. भाजपाला विरोधासाठी विरोध करण्याच्या ...