Posts

Showing posts with the label CoTien hill

20240824 Sat CoTien solo

Image
आगस्टच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात गावी जाऊन आल्यावर ही दुसरी चढाई.  आज नवीन पायवाटेने चढाई सुरू केली. पाव वाटेवर दोन्ही रस्ते एकत्रच येतात - तरी थोडी वेगळी मजा. पण हा नवीन रस्ता जास्त उभ्या चढणीचा आहे. दृश्य वेगळे व चांगले आहे यात वाद नाही.  आज कधी नव्हे ती फुल प्यांट घालून चढायला गेलो. आता चांगली ट्रॅक प्यांट भेटेस्तोवर परत फुलप्यांट कधीच नाही. पायांचा घाम पिऊन ती बिचारी ओली चिंब होत होती. उगीच चढायला त्रास.  काल झोपेचे खोबरे झालेले की आणखी काय ते कोण जाणे, पण आज तब्बल ३० मिनिटे जास्तीची घेतली. १६:४४ ते १७:५८ ~ ७४ मिनिटे! ही चढाई चाळीस ते पन्नास मिनिटांत करायचे आपले टारगेट आहे.  गेल्या आठवड्यात ४८ मिनिटे लागली होती. असो. काही बिघडत नाही. झेंडा फडकवल्याशी मतलब. Rest if you must, but do not quit!  माथ्यावर खरी मजा संध्याकाळ कलल्यावर येते. संधीप्रकाशाचा खेळ नजरेआड करीत वरची प्रजा खाली पळायच्या मागे असते. आपण मिनिटा मिनिटाला बदलणारा भवताल डोळ्यांत साठवीत घामेजल्या ओल्या कपड्यांवर मंद झुळुका अंगावर घेत शांत बसून रहायचे.  मग पूर्ण अंधार झाला, मन भरले,  डो...

20240615-16-Weekend-Cotien-group-&-LongSon-temple

Image
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी 🙏🏼     माझ्या घराच्या गॅलरीतून कधीही पहावे तेव्हा दूरवरून हे पांढरे स्वच्छ बुद्धदेव आशीर्वाद देताना दिसत असतात.    संध्याकाळच्या वेळी गाडीला टाच मारून पायथ्याशी यावे आणि ही छोटेखानी टेकडी चढून यांच्या पायाशी बसून वाऱ्याच्या झुळुकेसोबत तीन्हीसांजा ढळू द्याव्यात. 👌🏽❤️     आपल्याला प्रेक्षणीय स्थळे बनलेल्या मंदीरांत जायला आवडत नाही. पैशाचा खेळ, व्हीआयपी लाइनी वेगेरे ठिकाणींही नाही. प्रामुख्याने परदेशात देवालयांमधे उपासनेसाठी / भाविकतेने येणारे वाटसरू पाहिले की घरच्यासारखे वाटते. आज या मंदीराच्या आवारात एका अर्धमंडलात वयस्कर गुरूजींसोबत एक कुटुंब हात जोडून उभे होते. समोर एक पक्ष्यांचा पिंजरा होता. गुरूजी त्या लोकांना मंत्र म्हणवीत होते. थोड्या वेळाने त्यांतल्या प्रौढ बाईने पिंजऱ्याचे दार उघडले आणि पक्ष्यांना मोकळे केले. बहुदा घरी दिवंगत झालेल्या एखाद्या सदस्याचे हे क्रीयाकर्म असावे. पक्षी मोकळे करणे हे आत्म्याला बंधमुक्त करण्याचे निदर्शक असावे.     दर लाखा दोन लाखाच्या वस्तीसाठी एक टेकडी असावी आणि तिच्यावर एक मंदीर ...

20240525 Sat CoTien 3 peaks Solo ... आणि एक कविता

Image
 डोंगर चढायचा म्हटलं की शिदोरी बांधून देताना गृहस्वामिनीचा प्रश्न ठरलेला, “काय ठेवलंय त्या डोंगरात एवढं”?    गोनीदांना कुणी विचारले,  “आप्पा, कशाला जाता या त्या शिखरावर सारखे?”  – की आप्पांनी उत्तर द्यावे –  “ते तिथे आहे म्हणून!”  आपल्याला त्यांच्यासारखी समर्पक वन लायनर जमायची नाही. पण गेल्या काही दिवसांच्या पायपिटीनंतर आज ही गवसलेली उत्तर कविता आहे.          उगा कशाला त्रास जिवाला,        कशास डोंगर चढायचा?         खालुन कुतुहल जागत राही,        अन आकर्षण उंचीचे       बाल्य जवानी आणि खुणावे,        स्मरणही केल्या मौजीचे       अता वेडपण सोसावे का,        का धोका पत्करायचा        उगा कशाला त्रास जिवाला,        कशास डोंगर चढायचा?         लावुन जिंका स्वतःस पैजा,        लढा उभारा अपुल्याशी   ...

20240511-12 Sat Sun CoTien Hill

Image
Seldom i dare climbing hills on both the week end days. Yesterday i did that and i ended up over exerting myself. Of course i did. At 49 I'm not growing any younger after all.       For Sunday, 12 May 2024 the word was already out on our group for joining the #CoTien_hill trek @ our #NhaTrang city. Our usual members had enrolled and it completely slipped my mind on Sat, the 11th as my feet automatically turned to the hill by around after 4 pm.      My ascend started at 17:24 & at 16:04 i was bowing my head to the deity on the first peak. 40 minutes is my new personal best so far. If a successful trek is an outcome of habit and stamina, the i think i am close to clearing the habit part. However the feeling of winning over your fears is absolutely blissful.   The next day on 12th May, Sunday our Khanh reminds me of our group trek on the same hill. OMG, since i am the front runner of the group i cannot just not go there. Furthermore the Minh Phat...