Posts

Showing posts from August, 2026

20260818 Who'll fight for the daily life issues

Image
(… पूर्वार्ध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसाठी व उत्तरार्ध राजकीय पक्षासाठी) जगण्याच्या प्रश्नांवरून भांडायचे कुणी?  'जगण्याशी संबंधित प्रश्नां'वरून आंदोलने करून सरकारला जाब विचारण्याची नवी पद्धत पडते आहे. "काँग्रेस सत्तेत असताना अशी आंदोलने (यशस्वी) का नाही झाली" असा प्रश्न विचारला जातो आहे. त्याची अनेक उत्तरे आहेत. विदेशी ढवळाढवळी सोबतच, आंदोलकांची राजकीय सोयिस्करता, बदलती सामाजिक मूल्ये, वाढता consumerism व तरूणांची वाढती अधीरता हे पैलू यास कारणीभूत असले तरी ही आंदोलने करवणाऱ्यांचा वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन 'व्यवस्थेशी भांडण्याचा' आजवरचा दांडगा अनुभव हा पैलू मुख्य आहे. काँग्रेस सत्तेत असताना विरोधातले हिंदुत्वनिष्ठ हे प्रामुख्याने हिंदू व राष्ट्रीय प्रश्नांवर सरकारशी भांडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करीत. न भूतो न भविष्यति व प्रदीर्घ असे रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनही भाजपाला लगेच व हुकमी सत्ता देऊ शकले नाही. त्यासाठी दशकांनंतर 'अच्छे दिन'चे वचन कामी आले.  हिंदुत्वनिष्ठांनी कधी रस्ते, पाणी, शौचालये, शाळा, हास्पिटले, स्वच्छता, भ्रष्टाचार, नागरी अधिकार व सुविधा...