20240615-16-Weekend-Cotien-group-&-LongSon-temple

तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी 🙏🏼
 
 
माझ्या घराच्या गॅलरीतून कधीही पहावे तेव्हा दूरवरून हे पांढरे स्वच्छ बुद्धदेव आशीर्वाद देताना दिसत असतात.
  
संध्याकाळच्या वेळी गाडीला टाच मारून पायथ्याशी यावे आणि ही छोटेखानी टेकडी चढून यांच्या पायाशी बसून वाऱ्याच्या झुळुकेसोबत तीन्हीसांजा ढळू द्याव्यात. 👌🏽❤️
 
 
आपल्याला प्रेक्षणीय स्थळे बनलेल्या मंदीरांत जायला आवडत नाही. पैशाचा खेळ, व्हीआयपी लाइनी वेगेरे ठिकाणींही नाही. प्रामुख्याने परदेशात देवालयांमधे उपासनेसाठी / भाविकतेने येणारे वाटसरू पाहिले की घरच्यासारखे वाटते. आज या मंदीराच्या आवारात एका अर्धमंडलात वयस्कर गुरूजींसोबत एक कुटुंब हात जोडून उभे होते. समोर एक पक्ष्यांचा पिंजरा होता. गुरूजी त्या लोकांना मंत्र म्हणवीत होते. थोड्या वेळाने त्यांतल्या प्रौढ बाईने पिंजऱ्याचे दार उघडले आणि पक्ष्यांना मोकळे केले. बहुदा घरी दिवंगत झालेल्या एखाद्या सदस्याचे हे क्रीयाकर्म असावे. पक्षी मोकळे करणे हे आत्म्याला बंधमुक्त करण्याचे निदर्शक असावे.
 
 
दर लाखा दोन लाखाच्या वस्तीसाठी एक टेकडी असावी आणि तिच्यावर एक मंदीर ~ असा आंतरराष्ट्रीय कायदा झाला पाहिजे असा आम्ही या क्षणी एलान करीत आहोत.
  
#Long_Son_temple  #NhaTrang  #Vietnam_diary 

दिवस साजरा करायचा म्हणून आज जेवणात थालीपीठाचा बेत केला - तो उत्तम जमूनही आला! 
 
 
कालच्या शनिवारी (१५ जून २०२४) पुन्हा एकदा CoTien डोंगराचा ग्रूप ट्रेक झाला. 
खरे तर २२ जूनला पौर्णिमा आहे तेव्हा करू असे मी म्हटले होते. 
पण आमच्या लोकानला धीर नाही. त्यांनी पाणी, खाणं, फ़ळं - सगळं घेऊन वर चढण्याचा बूट काढला. स्वतःच्या पाण्याबरोबर एक फ़ळांची पिशवी वर चढवताना आपली हालत खराब झाली. त्यातच पडसे झालेले. मग काय विचारता. फ़जितीच फ़जिती. पण शेवटी डोंगर माथा गाठलाच. "Rest if you must, but do not quit"! 
 
 

Comments

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -