20240824 Sat CoTien solo

आगस्टच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात गावी जाऊन आल्यावर ही दुसरी चढाई. 

आज नवीन पायवाटेने चढाई सुरू केली. पाव वाटेवर दोन्ही रस्ते एकत्रच येतात - तरी थोडी वेगळी मजा. पण हा नवीन रस्ता जास्त उभ्या चढणीचा आहे. दृश्य वेगळे व चांगले आहे यात वाद नाही. 

आज कधी नव्हे ती फुल प्यांट घालून चढायला गेलो. आता चांगली ट्रॅक प्यांट भेटेस्तोवर परत फुलप्यांट कधीच नाही. पायांचा घाम पिऊन ती बिचारी ओली चिंब होत होती. उगीच चढायला त्रास. 

काल झोपेचे खोबरे झालेले की आणखी काय ते कोण जाणे, पण आज तब्बल ३० मिनिटे जास्तीची घेतली. १६:४४ ते १७:५८ ~ ७४ मिनिटे! ही चढाई चाळीस ते पन्नास मिनिटांत करायचे आपले टारगेट आहे. 

गेल्या आठवड्यात ४८ मिनिटे लागली होती. असो. काही बिघडत नाही. झेंडा फडकवल्याशी मतलब. Rest if you must, but do not quit! 

माथ्यावर खरी मजा संध्याकाळ कलल्यावर येते. संधीप्रकाशाचा खेळ नजरेआड करीत वरची प्रजा खाली पळायच्या मागे असते. आपण मिनिटा मिनिटाला बदलणारा भवताल डोळ्यांत साठवीत घामेजल्या ओल्या कपड्यांवर मंद झुळुका अंगावर घेत शांत बसून रहायचे. 

मग पूर्ण अंधार झाला, मन भरले, डोंगर निर्मनुष्य झाला - की सावकाश उतरून खाली यायचे. 


आग्नेय आशियाई देशांचे, संपूर्ण शहराला आशीर्वाद देणारी बौद्ध देवता डोंगरा डोंगरांवर असणे हे मोठे सुंदर वैशिष्ट्य आहे. 🪷🙏🏽


दिवसाची सुरुवात कोबीची भाजी आणि च्या चपातीने केली आणि संध्याकाळी हा "प्फ़ऽ". chicken pho ... (rice noodle soup) for dinner ... local food ~ व्हेली चिप् ~ ₹ 100/- 
 
nirmally all 'Pho' shops don't serve you chicken (only beef & pork), but this Pho-113 chain has this option. 
 
u hv to go to a fancy / expensive shop for real vegetarian Pho. 
 

आता महिनोन्‌ महिने असा ’एवढाच’ द्वीभुक्त राहूनसुद्धा वजन काही कमी होयाला मागत नाही हे खरे टेन्शन आहे. काय करनार? विलाज नाही. 

#Vietnam_Diary  |  #Cotien_Hill | सर्व प्रकाशचित्रे भारतीय लाव्हा मोबाइलने घेतलेली

Comments

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -