20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -
सध्या हिंदुत्व विचारात दिसणारे मुख्य प्रवाह म्हणजे -
[१] हिंदुधर्मातले ईश्वर तत्व, कर्मकांडे यां पलिकडे जाऊन प्रामुख्याने राजकीय / राष्ट्रीय / विज्ञाननिष्ठ हिंदू बनणे; त्यासाठी संकीर्ण अभिनिवेशांचे विसर्जन करणे, आवश्यक सुधारणा करवणे = सावरकरी पीळ
[२] ईश्वर भक्ती, तत्संबद्ध प्रेरणा, भावना, कर्मकांडे, पोथीनिष्ठा, परंपरानिष्ठा, रूढीप्रियता, identity चा आग्रह, मंदिरे यां सर्वांचा एकत्रित आविष्कार = सनातनी पीळ
[३] यां दोहोंमधे सतत समन्वयाचे पूल बांधत राहणे, मध्यममार्ग शोधत राहणे, समतोल साधण्याचा प्रयत्न करणे, वैचारिकतेचा आग्रह न धरता हिंदू संघटनावर फ़ोकस करणे, रचनात्मक कार्य = संघाचा पीळ
हे तीन्ही प्रमुख प्रवाह असले तरी यांतील मंडळींची एकमेकांत सरमिसळ होत असते.
यां सर्वांमधे व्युत्पन्नता, अनुकंपा, समदृष्टी, सृजनशीलता ... आणि इतर अनेक अपेक्षित सद्गुण काही सुटत नाहीत.
पण अहंमन्यता, डोळेझाक, प्रतिगामीत्व, पुरूष प्रधानता, जातभावना असे अपेक्षित नसलेले दुर्गुणही - त्या प्रणालीचा भाग नसले तरी काही मंडळींमधे डोकावू शकतात.
[४] चौथा एक प्रकार म्हणजे "कट्टर हिंदुत्व" - जे प्रसंगी चुकीच्या धारणांनाही कवटाळण्यास प्रत्यवाय मानत नाही. मारा, कापा, उखडून फ़ेका, जात - धर्म - लिंग अभिनिवेश इ. इ. काहीही तिथे त्याज्य नाही.
हे कट्टर हिंदुत्व यां तीन्ही प्रकारांच्या आजूबाजूस राहते. काही वेळा कामात येते व काही वेळा डोकेदुखी बनते.
--- --- ---
१९२०च्या दशकात सावरकरांनी हिंदुत्वाची मांडणी केली त्यावेळी त्यांच्यासमोर त्यांचा स्वतःचा व्यासंग, अनुभव, निरीक्षण, परिशीलन, चिंतन हे सर्व होतेच पण मुख्य प्रभाव हा श्यामजी कृष्ण वर्मा प्रभृतींच्या सहवासाने आर्य समाजाचा होता - असे मला वाटते. पण आर्य समाजाचा पाया हाच वेदप्रामाण्य असूनही वेद - उपनिषदे व इतर जुने ग्रंथ हे संदर्भासाठी न वापरता ते मैलाचे दगड म्हणून वापरावेत असे त्यांनी सांगितले. आर्य समाजाने सांगितलेली सामाजिक समता त्यांनी प्रामुख्याने स्वीकारली. त्यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या प्रागतिक मांडणीवर त्या काळात युरोपात होत असलेल्या डाव्या चळवळींचाही प्रभाव पडून गेला आहे. अर्थात त्यामुळे हिंदुत्वात आधुनिकता आली आहे.
आज पब्लिक डोमेनमधे यां सर्व प्रकारच्या लोकांची आपापले आग्रह रेटण्याची चढाओढ लागलेली दिसते.
हिंदुत्वनिष्ठ सरकार कडून प्रत्येकाला आपापल्या अपेक्षा आहेत.
यांतील परस्पर असहमती हा आपला दागिना आहे यात वाद नाही.
पण त्या दागिन्याचे सातत्याने जाहीर प्रदर्शन करून चुकीच्या नजरा ओढवून घेणे श्रेयस्कर नाही हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
अन्यथा या असहमतीला faultline बनवून हिंदू विमर्षात फ़ूट पाडण्याचे कारस्थान कधीही सुरू होऊ शकते.
की आलरेडी सुरू झाले आहे ???
या नोंदीचा विस्तार करायचा आहे.
बघू कधी वेळ मिळतो - कधी जमते ते.
बघू कधी वेळ मिळतो - कधी जमते ते.

Comments