20240615-16-Weekend-Cotien-group-&-LongSon-temple
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी 🙏🏼 माझ्या घराच्या गॅलरीतून कधीही पहावे तेव्हा दूरवरून हे पांढरे स्वच्छ बुद्धदेव आशीर्वाद देताना दिसत असतात. संध्याकाळच्या वेळी गाडीला टाच मारून पायथ्याशी यावे आणि ही छोटेखानी टेकडी चढून यांच्या पायाशी बसून वाऱ्याच्या झुळुकेसोबत तीन्हीसांजा ढळू द्याव्यात. 👌🏽❤️ आपल्याला प्रेक्षणीय स्थळे बनलेल्या मंदीरांत जायला आवडत नाही. पैशाचा खेळ, व्हीआयपी लाइनी वेगेरे ठिकाणींही नाही. प्रामुख्याने परदेशात देवालयांमधे उपासनेसाठी / भाविकतेने येणारे वाटसरू पाहिले की घरच्यासारखे वाटते. आज या मंदीराच्या आवारात एका अर्धमंडलात वयस्कर गुरूजींसोबत एक कुटुंब हात जोडून उभे होते. समोर एक पक्ष्यांचा पिंजरा होता. गुरूजी त्या लोकांना मंत्र म्हणवीत होते. थोड्या वेळाने त्यांतल्या प्रौढ बाईने पिंजऱ्याचे दार उघडले आणि पक्ष्यांना मोकळे केले. बहुदा घरी दिवंगत झालेल्या एखाद्या सदस्याचे हे क्रीयाकर्म असावे. पक्षी मोकळे करणे हे आत्म्याला बंधमुक्त करण्याचे निदर्शक असावे. दर लाखा दोन लाखाच्या वस्तीसाठी एक टेकडी असावी आणि तिच्यावर एक मंदीर ...