20240824 Sat CoTien solo
आगस्टच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात गावी जाऊन आल्यावर ही दुसरी चढाई. आज नवीन पायवाटेने चढाई सुरू केली. पाव वाटेवर दोन्ही रस्ते एकत्रच येतात - तरी थोडी वेगळी मजा. पण हा नवीन रस्ता जास्त उभ्या चढणीचा आहे. दृश्य वेगळे व चांगले आहे यात वाद नाही. आज कधी नव्हे ती फुल प्यांट घालून चढायला गेलो. आता चांगली ट्रॅक प्यांट भेटेस्तोवर परत फुलप्यांट कधीच नाही. पायांचा घाम पिऊन ती बिचारी ओली चिंब होत होती. उगीच चढायला त्रास. काल झोपेचे खोबरे झालेले की आणखी काय ते कोण जाणे, पण आज तब्बल ३० मिनिटे जास्तीची घेतली. १६:४४ ते १७:५८ ~ ७४ मिनिटे! ही चढाई चाळीस ते पन्नास मिनिटांत करायचे आपले टारगेट आहे. गेल्या आठवड्यात ४८ मिनिटे लागली होती. असो. काही बिघडत नाही. झेंडा फडकवल्याशी मतलब. Rest if you must, but do not quit! माथ्यावर खरी मजा संध्याकाळ कलल्यावर येते. संधीप्रकाशाचा खेळ नजरेआड करीत वरची प्रजा खाली पळायच्या मागे असते. आपण मिनिटा मिनिटाला बदलणारा भवताल डोळ्यांत साठवीत घामेजल्या ओल्या कपड्यांवर मंद झुळुका अंगावर घेत शांत बसून रहायचे. मग पूर्ण अंधार झाला, मन भरले, डो...