Posts

Showing posts from September, 2024

20240902 An's farm Sea Restaurant & Temple Chua Phat Danh Bao Vuong

Image
आज व्हिएतनामच्या हॅप्पी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त आमच्या सौ व श्री कान्ह लोकांनी एक छोटेखानी ट्रिप काढवली. ती म्हणजे सौ बिक नोक्‌ कान्ह च्या माहेरच्या fishermen village मधे एका भर समुद्रातल्या लाकडी उपाहारगृहात दुपार घालवणे.    मी, आमचा साहेब सुरेश, सेक्रेटरी युएन, सहकारी कान्ह आणि न्यॅन आणि त्यांची कुटुंबे असा आमचा कबिला होता.    Nhà trên biển - An’s Farm : https://maps.app.goo.gl/XK8Jv6qrXnhQaB6d8 ही जागा एकदम फ़र्मास निघाली. नोक्‌च्या काकांचे हे हाटेल. पहिल्यांदा समुद्र किनारी त्यांच्याच घरात स्कुटरी ठेवल्या, चहापाणी केले. टिपिकल खेड्यातले घर! फ़रशीवरती लोळत पडलेली पोरे. घरातली बाहेरची कामे फ़टाफ़ट लीलया उरकणाऱ्या काटक महिला. घरात हा एवढा पसारा - पण स्वच्छ नेटके छोटे घर. समोरच्या धक्क्यावरून छोट्या होडीने त्यांच्या उपाहारगृहात ते आम्हांला घेऊन गेले.    चारही बाजूंनी समुद्र आणि कोळी लोकांचे सेटप. उघड्या झोपडीला वेढणाऱ्या थंडगार झुळुका. क्या बात है. मी तर तिथल्या हॅमोकचा ताबा घेतला आणि भरपूर आराम केला.  छोटे - मोठे ऑयस्टर्स, उकडलेला ताजा पापलेट, ...