20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -
सध्या हिंदुत्व विचारात दिसणारे मुख्य प्रवाह म्हणजे - [१] हिंदुधर्मातले ईश्वर तत्व, कर्मकांडे यां पलिकडे जाऊन प्रामुख्याने राजकीय / राष्ट्रीय / विज्ञाननिष्ठ हिंदू बनणे; त्यासाठी संकीर्ण अभिनिवेशांचे विसर्जन करणे, आवश्यक सुधारणा करवणे = सावरकरी पीळ [२] ईश्वर भक्ती, तत्संबद्ध प्रेरणा, भावना, कर्मकांडे, पोथीनिष्ठा, परंपरानिष्ठा, रूढीप्रियता, identity चा आग्रह, मंदिरे यां सर्वांचा एकत्रित आविष्कार = सनातनी पीळ [३] यां दोहोंमधे सतत समन्वयाचे पूल बांधत राहणे, मध्यममार्ग शोधत राहणे, समतोल साधण्याचा प्रयत्न करणे, वैचारिकतेचा आग्रह न धरता हिंदू संघटनावर फ़ोकस करणे, रचनात्मक कार्य = संघाचा पीळ हे तीन्ही प्रमुख प्रवाह असले तरी यांतील मंडळींची एकमेकांत सरमिसळ होत असते. यां सर्वांमधे व्युत्पन्नता, अनुकंपा, समदृष्टी, सृजनशीलता ... आणि इतर अनेक अपेक्षित सद्गुण काही सुटत नाहीत. पण अहंमन्यता, डोळेझाक, प्रतिगामीत्व, पुरूष प्रधानता, जातभावना असे अपेक्षित नसलेले दुर्गुणही - त्या प्रणालीचा भाग नसले तरी ...