31 May (1725) - Mata Ahilya Devi's 299th Birthday
३१ मे (१७२५) ... हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इंग्रजी तारखेनुसार २९९ वा जन्मदिवस आहे. तन्निमित्त "महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर" या पुस्तकाची हा छोटीशी ओळख. कट्टर फ़ेमिनिस्ट व पुरूषी अहंकार जोजवणारे - अशा दोन्हींनी हे पुस्तक पूर्ण जागृत प्रज्ञेने वाचावे. पुण्यश्लोक अहिल्यामाईंचे हे चरित्र एकाच दिवसात वाचून काढले. बहुतांश ओलावलेल्या डोळ्यांनी. या विजयाबाई जहागिरदारांकरवी आपल्याला ही वाचन भेट मिळावी हेही आपले पूर्वसंचित म्हणावे इतक्या रसाळ, बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत पण भावपूर्ण पद्धतीने संपूर्ण अभ्यासान्ती त्यांनी ही रचना केली आहे. अहिल्यामाईच्या आयुष्यात सतत आणि सतत नशिबाशी झगडणेच लिहिले होते. खेदाने म्हणावेसे वाटते की तथाकथित धर्मरूढी आणि पुरुषी वर्चस्ववाद यांच्या बेड्या त्यांच्याही पायी पडल्या अन्यथा त्यांचा चरित्रसूर्य आतापेक्षाही शतपटीने तळपला असता. त्या सूर्यात जरूर त्यासाठी दाहकता होती तर दुःखितांसाठीचा सोनेरी उबदारपणा होता. नशिबाशी सतत दोन हात होऊनही त्याला दोष न देता त्यांनी एकट्यांनी घेतलेली राजकीय, ...