Posts

20240902 An's farm Sea Restaurant & Temple Chua Phat Danh Bao Vuong

Image
आज व्हिएतनामच्या हॅप्पी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त आमच्या सौ व श्री कान्ह लोकांनी एक छोटेखानी ट्रिप काढवली. ती म्हणजे सौ बिक नोक्‌ कान्ह च्या माहेरच्या fishermen village मधे एका भर समुद्रातल्या लाकडी उपाहारगृहात दुपार घालवणे.    मी, आमचा साहेब सुरेश, सेक्रेटरी युएन, सहकारी कान्ह आणि न्यॅन आणि त्यांची कुटुंबे असा आमचा कबिला होता.    Nhà trên biển - An’s Farm : https://maps.app.goo.gl/XK8Jv6qrXnhQaB6d8 ही जागा एकदम फ़र्मास निघाली. नोक्‌च्या काकांचे हे हाटेल. पहिल्यांदा समुद्र किनारी त्यांच्याच घरात स्कुटरी ठेवल्या, चहापाणी केले. टिपिकल खेड्यातले घर! फ़रशीवरती लोळत पडलेली पोरे. घरातली बाहेरची कामे फ़टाफ़ट लीलया उरकणाऱ्या काटक महिला. घरात हा एवढा पसारा - पण स्वच्छ नेटके छोटे घर. समोरच्या धक्क्यावरून छोट्या होडीने त्यांच्या उपाहारगृहात ते आम्हांला घेऊन गेले.    चारही बाजूंनी समुद्र आणि कोळी लोकांचे सेटप. उघड्या झोपडीला वेढणाऱ्या थंडगार झुळुका. क्या बात है. मी तर तिथल्या हॅमोकचा ताबा घेतला आणि भरपूर आराम केला.  छोटे - मोठे ऑयस्टर्स, उकडलेला ताजा पापलेट, ...

20240824 Sat CoTien solo

Image
आगस्टच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात गावी जाऊन आल्यावर ही दुसरी चढाई.  आज नवीन पायवाटेने चढाई सुरू केली. पाव वाटेवर दोन्ही रस्ते एकत्रच येतात - तरी थोडी वेगळी मजा. पण हा नवीन रस्ता जास्त उभ्या चढणीचा आहे. दृश्य वेगळे व चांगले आहे यात वाद नाही.  आज कधी नव्हे ती फुल प्यांट घालून चढायला गेलो. आता चांगली ट्रॅक प्यांट भेटेस्तोवर परत फुलप्यांट कधीच नाही. पायांचा घाम पिऊन ती बिचारी ओली चिंब होत होती. उगीच चढायला त्रास.  काल झोपेचे खोबरे झालेले की आणखी काय ते कोण जाणे, पण आज तब्बल ३० मिनिटे जास्तीची घेतली. १६:४४ ते १७:५८ ~ ७४ मिनिटे! ही चढाई चाळीस ते पन्नास मिनिटांत करायचे आपले टारगेट आहे.  गेल्या आठवड्यात ४८ मिनिटे लागली होती. असो. काही बिघडत नाही. झेंडा फडकवल्याशी मतलब. Rest if you must, but do not quit!  माथ्यावर खरी मजा संध्याकाळ कलल्यावर येते. संधीप्रकाशाचा खेळ नजरेआड करीत वरची प्रजा खाली पळायच्या मागे असते. आपण मिनिटा मिनिटाला बदलणारा भवताल डोळ्यांत साठवीत घामेजल्या ओल्या कपड्यांवर मंद झुळुका अंगावर घेत शांत बसून रहायचे.  मग पूर्ण अंधार झाला, मन भरले,  डो...

20240615-16-Weekend-Cotien-group-&-LongSon-temple

Image
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी 🙏🏼     माझ्या घराच्या गॅलरीतून कधीही पहावे तेव्हा दूरवरून हे पांढरे स्वच्छ बुद्धदेव आशीर्वाद देताना दिसत असतात.    संध्याकाळच्या वेळी गाडीला टाच मारून पायथ्याशी यावे आणि ही छोटेखानी टेकडी चढून यांच्या पायाशी बसून वाऱ्याच्या झुळुकेसोबत तीन्हीसांजा ढळू द्याव्यात. 👌🏽❤️     आपल्याला प्रेक्षणीय स्थळे बनलेल्या मंदीरांत जायला आवडत नाही. पैशाचा खेळ, व्हीआयपी लाइनी वेगेरे ठिकाणींही नाही. प्रामुख्याने परदेशात देवालयांमधे उपासनेसाठी / भाविकतेने येणारे वाटसरू पाहिले की घरच्यासारखे वाटते. आज या मंदीराच्या आवारात एका अर्धमंडलात वयस्कर गुरूजींसोबत एक कुटुंब हात जोडून उभे होते. समोर एक पक्ष्यांचा पिंजरा होता. गुरूजी त्या लोकांना मंत्र म्हणवीत होते. थोड्या वेळाने त्यांतल्या प्रौढ बाईने पिंजऱ्याचे दार उघडले आणि पक्ष्यांना मोकळे केले. बहुदा घरी दिवंगत झालेल्या एखाद्या सदस्याचे हे क्रीयाकर्म असावे. पक्षी मोकळे करणे हे आत्म्याला बंधमुक्त करण्याचे निदर्शक असावे.     दर लाखा दोन लाखाच्या वस्तीसाठी एक टेकडी असावी आणि तिच्यावर एक मंदीर ...

31 May (1725) - Mata Ahilya Devi's 299th Birthday

Image
३१ मे (१७२५) ... हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इंग्रजी तारखेनुसार २९९ वा जन्मदिवस आहे. तन्निमित्त "महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर" या पुस्तकाची हा छोटीशी ओळख.      कट्टर फ़ेमिनिस्ट व पुरूषी अहंकार जोजवणारे - अशा दोन्हींनी हे पुस्तक पूर्ण जागृत प्रज्ञेने वाचावे.  पुण्यश्लोक अहिल्यामाईंचे हे चरित्र एकाच दिवसात वाचून काढले. बहुतांश ओलावलेल्या डोळ्यांनी.    या विजयाबाई जहागिरदारांकरवी आपल्याला ही वाचन भेट मिळावी हेही आपले पूर्वसंचित म्हणावे इतक्या रसाळ, बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत पण भावपूर्ण पद्धतीने संपूर्ण अभ्यासान्ती त्यांनी ही रचना केली आहे.    अहिल्यामाईच्या आयुष्यात सतत आणि सतत नशिबाशी झगडणेच लिहिले होते. खेदाने म्हणावेसे वाटते की तथाकथित धर्मरूढी आणि पुरुषी वर्चस्ववाद यांच्या बेड्या त्यांच्याही पायी पडल्या अन्यथा त्यांचा चरित्रसूर्य आतापेक्षाही शतपटीने तळपला असता. त्या सूर्यात जरूर त्यासाठी दाहकता होती तर दुःखितांसाठीचा सोनेरी उबदारपणा होता.    नशिबाशी सतत दोन हात होऊनही त्याला दोष न देता त्यांनी एकट्यांनी घेतलेली राजकीय, ...

20240525 Sat CoTien 3 peaks Solo ... आणि एक कविता

Image
 डोंगर चढायचा म्हटलं की शिदोरी बांधून देताना गृहस्वामिनीचा प्रश्न ठरलेला, “काय ठेवलंय त्या डोंगरात एवढं”?    गोनीदांना कुणी विचारले,  “आप्पा, कशाला जाता या त्या शिखरावर सारखे?”  – की आप्पांनी उत्तर द्यावे –  “ते तिथे आहे म्हणून!”  आपल्याला त्यांच्यासारखी समर्पक वन लायनर जमायची नाही. पण गेल्या काही दिवसांच्या पायपिटीनंतर आज ही गवसलेली उत्तर कविता आहे.          उगा कशाला त्रास जिवाला,        कशास डोंगर चढायचा?         खालुन कुतुहल जागत राही,        अन आकर्षण उंचीचे       बाल्य जवानी आणि खुणावे,        स्मरणही केल्या मौजीचे       अता वेडपण सोसावे का,        का धोका पत्करायचा        उगा कशाला त्रास जिवाला,        कशास डोंगर चढायचा?         लावुन जिंका स्वतःस पैजा,        लढा उभारा अपुल्याशी   ...